Breaking | जम्मूमध्ये सुरक्षा दलांकडून दोन दहशतवादी ठार

जम्मू - काश्मीरमध्ये लष्कराच्या सात जवानांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी पुंछ आणि राजौरी जिल्ह्यातील जंगलात सैन्य दलाकडून शोध मोहीम रविवारी सातव्या दिवशीही सुरू आहे. दरम्यान, सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

जम्मू – काश्मीरमध्ये लष्कराच्या सात जवानांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी पुंछ आणि राजौरी जिल्ह्यातील जंगलात सैन्य दलाकडून शोध मोहीम रविवारी सातव्या दिवशीही सुरू आहे. या दरम्यान, कनिष्ठ कमिशन्ड ऑफिसरसह (जेसीओ) दोन सैनिक शहीद झाले. दोन जवानांच्या मृत्यूमुळं आतापर्यंत शहीद झालेल्या जवानांची संख्या 9 वर पोहोचली आहे. पुंछच्या सुरणकोटे जंगलात सोमवारी सुरू झालेल्या कारवाईत आतापर्यंत नऊ सैनिक शहीद झाले आहेत. पुढे ही शोधमोहीम पुंछमधील मेंढर आणि राजौरीतील थानामंडीपर्यंत सुरु आहे. दरम्यान, सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

उत्तराखंडमधील 2 जवान शहीद

गुरुवारी दहशतवाद्यांशी चकमक झाली होती त्या ठिकाणाजवळ मेंढरच्या नार खास जंगल परिसरात एक जेसीओ आणि जवानाचे मृतदेह सापडले. या दरम्यान, जीव गमावलेल्या सैनिकांची संख्या आता चार झाली आहे. याआधी, नार खास जंगलात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत रायफलमन विक्रम सिंह नेगी आणि योगम्बर सिंह शहीद झाल्याच्या वृत्ताची खातरजमा करण्यात आली आहे. नेगी आणि सिंह दोघेही उत्तराखंडचे होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI