Seema Haider Latest News : भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया; म्हणाली, ‘मी पाकिस्तानची..’
Seema Haider Viral Video : पाकिस्तानमधून आपल्या प्रियकरासाठी देश सोडून भारतात पळून आलेल्या सीमा हैदरचं टेंशन आता वाढलं आहे. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा सरकारने रद्द केलेले असल्याने त्यावर सीमा हैदरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर पाऊलं उचलत पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला आहे. त्यामुळे या पाकिस्तानी नागरिकांना आता भारत सोडवा लागणार आहे. यामुळे आता पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरच्या चिंतेत वाढ झाली आहे. यावर आता सीमाने प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी पाकिस्तानची मुलगी होते, पण आता भारताची सून आहे.’ असं सीमा हैदर हीने यावर बोलताना म्हंटलं आहे. पाकिस्तानमधून आपल्या प्रियकरासाठी देश सोडून भारतात पळून आलेली सीमा हैदरला भारत सोडावा लागणार का? अशा चर्चा होत असतानाच आता सीमा हैदरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Published on: Apr 27, 2025 11:30 AM
Follow Us
Latest Videos
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
