राष्ट्रवादी पक्षप्रवेशावर निळू फुले यांच्या लेकीनं स्पष्ट केलं कारण; म्हणाली, “बाबा आणि…”
यावर बोलताना गार्गी म्हणाली, मला, अनेक दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. मला विचारणा झाल्यानंतर लगेचच मी होकार दिला.
मुंबई : ज्येष्ठ सिने अभिनेते स्वर्गीय निळू फुले यांची मुलगी आणि अभिनेत्री गार्गी फुले हिने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यांनंतर तिने आपल्या राष्ट्रवादी प्रवेशाचे कारण स्पष्टच केलं. यावर बोलताना गार्गी म्हणाली, मला, अनेक दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. मला विचारणा झाल्यानंतर लगेचच मी होकार दिला. राष्ट्रवादी पक्षाची विचारसरणी, विचार जे आहेत तेच माझे बाबा निळू फुले यांचे होते. त्यामुळे माझ्या वडिलांचे जे विचार होते त्या विचारांना राष्ट्रवादी काँग्रेस न्याय देईल, असं मला वाटतं. तर राष्ट्रवादीसोबत काम करण्यास मला आनंद आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबत आमच्या कुटुंबाचे चांगले संबंध आहे. राजकारणात तरुणपिढी येत नाही असं बोलतात. पण प्रवाहात काम करायचे असेल तर उतरून काम करावे लागेल असं त्यांनी सांगितले.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

