Jalgaon| कडाक्याच्या थंडीमुळे केळीच्या उत्पादनाला करपा रोगाने घेरलं; जळगावातील शेतकरी चिंतेत
जळगावमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे केळीच्या उत्पादनाला करपा रोगाने घेरलंय. तापमानात मोठी घट झाल्याने हे नुकसान झाले आहे. तापमान 11 ते 8 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचलं आहे, त्यामुळे कडाक्याच्या थंडीने केळी उत्पादक शेतकर्यांना याचा फटका बसणार अशी भीती व्यक्त केली जात आहे.
जळगावमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे केळीच्या उत्पादनाला करपा रोगाने घेरलंय. तापमानात मोठी घट झाल्याने हे नुकसान झाले आहे. तापमान 11 ते 8 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचलं आहे, त्यामुळे कडाक्याच्या थंडीने केळी उत्पादक शेतकर्यांना याचा फटका बसणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. वाढत्या थंडीमुळे केळीच्या पिकांवर चरका आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचे दिसून येते. केळीचे खोड पूर्णपणे खराब होतं असल्याने शेतकरी वर्गात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. संपूर्ण पिकाला करपा लागला आहे. झाडाची पाने पिवळी होऊन नष्ट होत आहेत, त्यामुळे जळगावमधील शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येते. यावर उपाय योजनेची मागणी कृषी विभागाकडे करण्यात आली आहे. परंतु शेतकर्याचे नुकसान झाल्याने, शेतकरी हा अत्यंत चिंतित सापडला आहे.
BMC Election | महानगरपालिका निवडणुकी दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा
Devendra Fadnavis | सरकार अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे
Shambhuraj Desai | शिवसेनेचा भगवा घेतल्याशिवाय सत्ता स्थापन होणं अशक्य
उद्धवमामूंचा महापौर झाला तर...; अमित साटम यांचा ठाकरेंना टोला

