Shambhuraj Desai : एकनाथ शिंदेंवरील टीका दुर्दैवी, शंभूराज देसाईंची नाराजी, ठाकरेंवर टीकास्त्र
मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. यावर शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी ही टीका दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. काय म्हणालेत वाचा...
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. यावर शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी ही टीका दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. ‘एकनाथ शिंदेंना शिवसेनाप्रमुख व्हायचंय, अशी एकनाथ शिंदेंची कधीही भूमिका नव्हती, वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब हे आमचे दैवत आहे. जे काही कधी बोललंच नाही, ज्या गोष्टींचा उल्लेखच झाला नाही, ते पुढे आणून प्रतिमा खराब करायचं काम सुरू आहे,’ अशी टीका शंभूराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली. आज मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला आणि टीकाही सुरू झाल्या आहेत. यावरुन शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. शंभूराज देसाई यांनी बोलताना एक अत्यंत मोठा प्रश्न उपस्थित करत म्हणाले की, मग पक्षप्रमुख कसे मुख्यमंत्री झाले? शंभुराज देसाईंनी थेट उद्धव ठाकरेंनाच हा सवाल केलायं.
Published on: Jul 27, 2022 11:58 AM
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्

