Shambhuraj Desai : जे कधी बोललंच नाही, ते पुढे आणून प्रतिमा खराब करायचं काम सुरू, शंभूराज देसाईंचा आरोप
‘सत्तास्थापनेला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू असं शिवसेना पक्षप्रमुख म्हटले. त्यानंतर तशी चर्चा देखील होती, मग शेवटच्या दोन दिवसात अशी कुठे कांडी फिरली,’ असा सवाल शंभूराज देसाईंनी केला आहे.
मुंबई : शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. ‘एकनाथ शिंदेंना शिवसेनाप्रमुख व्हायचंय, अशी एकनाथ शिंदेंची कधीही भूमिका नव्हती, वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब हे आमचे दैवत आहे. जे काही कधी बोललंच नाही, ज्या गोष्टींचा उल्लेखच झाला नाही, ते पुढे आणून प्रतिमा खराब करायचं काम सुरू आहे,’ अशी टीका शंभूराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली. आज मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला आणि टीकाही सुरू झाल्या आहेत. यावरुन शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. शंभूराज देसाई यांनी बोलताना एक अत्यंत मोठा प्रश्न उपस्थित करत म्हणाले की, मग पक्षप्रमुख कसे मुख्यमंत्री झाले? शंभुराज देसाईंनी थेट उद्धव ठाकरेंनाच हा सवाल केलायं.
Published on: Jul 27, 2022 11:49 AM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

