Pimpri Chinchwad | मंदिरं खुली करण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून शंखनाद आंदोलन

राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंदिरं खुली करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. याविरोधात भाजपनं राज्यभरात शंखनाद आंदोलन सुरू केलंय.पंढरपूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगरसह राज्यात अनेक ठिकाणी हे आंदोलन होत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Aug 30, 2021 | 3:16 PM

राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंदिरं खुली करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. याविरोधात भाजपनं राज्यभरात शंखनाद आंदोलन सुरू केलंय.पंढरपूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगरसह राज्यात अनेक ठिकाणी हे आंदोलन होत आहे. राज्यातील मंदिरं सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपने पुण्यातही आंदोलन केलं. पुणेकरांचा पहिला मानाचा गणपती कसबा गणपती मंदिराबाहेर भाजपने आंदोलन केलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं. पुणेकरांचा पहिला मानाचा गणपती कसबा गणपती मंदिराबाहेर भाजपने आंदोलन केलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं. नाशिकमध्येही भाजप अध्यात्मिक आघाडीने शंखनाद आंदोलन केलं. रामकुंडावर आंदोलन करण्यात आलं. यावेळी साधू महंतांचीही उपस्थिती होती. साधू महंतांनी आंदोलनात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच मंदिर बंद विरोधात आक्रमक पवित्रा घेतला.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें