नितेश राणे बुद्धी भ्रष्ट झालेला भाजपचा आमदार, कुणी केली सडकून टीका
अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे देश सोडणार असल्याची शक्यता असल्याचे भाजप आमदार नितेश राणे यांनी वर्तविली आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचा नेता शरद कोळी यांनी नितेश राणे बुद्धी भ्रष्ट झालेला भाजपचा आमदार असल्याचे म्हणत सडकून टीका केली.
मुंबई, ८ नोव्हेंबर २०२३ | अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे देश सोडणार असल्याची शक्यता असल्याचे भाजप आमदार नितेश राणे यांनी वर्तविली आहे. इतकंच नाही तर त्यांनी हा त्यांच्यावर आरोप केलाय. या टीकेला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचा नेता शरद कोळी यांनी नितेश राणे बुद्धी भ्रष्ट झालेला भाजपचा आमदार असल्याचे म्हणत सडकून टीका केली. दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरे आज न् उद्या अडचणीत येणार, असल्याचे म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हा हल्लाबोल केला आहे. तर नितेश राणे बुद्धी भ्रष्ट झालेला भाजपचा आमदार असून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचा घणाघातही त्यांनी केला. भाजपची सुपारी घेऊन नितेश राणे ठाकरेंवर आरोप करताय. उद्धव ठाकरे अशा खालच्या स्तरावर जात नसून तुम्ही गुन्हेगार आहात, असा हल्लाबोलही शरद कोळी यांनी केलाय.

Tamannaah Bhatia : गोल्डन आऊटफिटमधील तमन्ना भाटियाचे खास फोटो, चाहते म्हणाले...

Sonam Kapoor Photos : निळ्या रंगाच्या आऊटफिटमधील सोनम कपूरचे ग्लॅमरस फोटो

अंकिता लोखंडे हिने फेकली मनारा चोप्रावर कॉफी

बॉलिवुड स्टार ऋतिक रोशनचं शिक्षण किती झालंय? जाणून घ्या

हळद जास्त खाल्ल्याने आरोग्याचं मोठं नुकसान, थेट किडनीवर...

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका होणार बंद? अत्यंत मोठा खुलासा
Latest Videos