ST Workers Strike: शरद पवार आणि अनिल परब यांच्यातील बैठक संपली, संपावर तोडगा नाहीच
महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी गेले काही दिवस एसटीचा संप सुरु असल्याचं म्हटलं. एसटीच्या संपामुळं ग्रामीण भागातील लोकांचं आणि शाळेत जाणाऱ्या लोकांचं मोठ्या प्रमाणात हाल होतं आहेत. शरद पवार यांनी अधिकारी आणि आमच्याकडून परिस्थिती समजून घेतली, असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं.
महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी गेले काही दिवस एसटीचा संप सुरु असल्याचं म्हटलं. एसटीच्या संपामुळं ग्रामीण भागातील लोकांचं आणि शाळेत जाणाऱ्या लोकांचं मोठ्या प्रमाणात हाल होतं आहेत. शरद पवार यांनी अधिकारी आणि आमच्याकडून परिस्थिती समजून घेतली. एसटीचा संप मिटवण्यासाठी प्रयत्न करणं, एसटी भविष्यात कशी रुळावर येईल आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आताच्या मागण्या यासंदर्भात चर्चा केली. सध्याच्या प्रश्नातून मार्ग काढून कामगार आणि जनतेचं समाधान कसं करता येईल, यासंदर्भात चर्चा झाली. विलीनीकरणासंदर्भात हायकोर्टाच्या आदेशानं नेमलेल्या समितीकडून अहवाल येईल. त्या समितीपुढं कोणती बाजू मांडायची यासंदर्भात चर्चा झाली. विलीनीकरणासंदर्भात हायकोर्टानं नेमलेल्या समितीचा अहवाल स्वीकारला जाईल. एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन आणि इतर राज्यांमधील कर्मचाऱ्यांचं वेतन यासंदर्भात चर्चा झाली. वेतनवाढ कशी देता येईल यासंदर्भात चर्चा झाली, असं अनिल परब यांनी सांगितलं.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

