AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | 'राष्ट्रवादी-भाजप युतीसाठी मोदींनी प्रयत्न केले' ?

Special Report | ‘राष्ट्रवादी-भाजप युतीसाठी मोदींनी प्रयत्न केले’ ?

| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 11:12 PM
Share

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. पण फडणवीस आणि अजितदादांची खेळी फार काळ टिकाव धरू शकली नाही, हे उभा महाराष्ट्र जाणतोच. अनेक जण विरोधकांना कात्रजचा घाट दाखवण्यासाठी ही खेळी शरद पवारांनी खेळल्याचे म्हणतात. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया दिलीय.

मुंबईः अवघा महाराष्ट्र साखरझोपेत असताना 23 नोव्हेंबर 2019 रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राजभवनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. पण फडणवीस आणि अजितदादांची खेळी फार काळ टिकाव धरू शकली नाही, हे उभा महाराष्ट्र जाणतोच. अनेक जण विरोधकांना कात्रजचा घाट दाखवण्यासाठी ही खेळी शरद पवारांनी खेळल्याचे म्हणतात. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया दिलीय.

पवार म्हणाले की…

शरद पवार यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतली. यावेळी त्यांनी अवघ्या देशाला कोड्यात टाकणाऱ्या त्या पहाटेच्या शपथविधीबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी मिश्किल हसत पवारांनी सडेतोड उत्तर दिले. पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांसोबतच्या शपथविधीसाठी अजित पवारांना मी पाठवलं असं म्हणतात हे खरं आहे. पण मी पाठवलं असतं, तर तिथे राज्यच बनवलं असतं. असं अर्धवट काही काम केलं नसतं. याच्यात काहीही अर्थ नाही. त्यात दुसऱ्या काही गोष्टी आहेत, असा सूचक उल्लेख पवारांनी यावेळी केला. मात्र, त्यात दुसऱ्या गोष्टी कोणत्या होत्या, हे काही त्यांनी सांगितलं नाही.