शरद पवार करणार फडणवीसांशी चर्चा! मोठं कारण आलं समोर…
पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कमी मोबदल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. बाधित शेतकऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली असून, पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही याबाबत चर्चा करणार असल्याचे जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी पवारांचा प्रयत्न सुरु आहे.
प्रदीप कापसे, प्रतिनिधी
पुरंदर विमानतळ मोबदला प्रश्नी शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. कमी मोबदला दिला जात असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणण आहे. शेतकऱ्यांनी या प्रश्नी पवारांची भेट घेतली आहे. त्यानंतर पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू असं आश्वासन पवारांनी शेतकऱ्यांना यावेळी दिलं आहे.
पुरंदर विमानतळसाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून भूसंपादन करत आहे. मात्र हे भूसंपादन करत असताना मिळणारा आर्थिक परतावा हा कमी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणण आहे. त्यामुळे काल साखर संकुलात या बाधित शेतकऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यावर पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांशी यावर चर्चा केली. आता शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

