चर्चा तर होणारच! हे कोल्हापूर हाय; कमळाची शिंदे गटाच्या खासदाराला भूरळ, काय घडतयं राजकारणात?
कोल्हापूरच्या एका खासदाराची जोरदार चर्चा रंगली असून शिंदे गटाचा हा खासदार 2024 ची निवडणूक थेट भाजपच्या चिन्हावर लढवणार असल्याचे बोललं जात आहे. शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांनी मात्र ही वस्तूस्थिती नसून आपण शिवसेना पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं आहे.
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शिंदे गट आणि भाजपमध्ये धूसफूत पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदे गटातील वाद हे चव्हाट्यावर आले आहेत. याचदरम्यान कोल्हापूरच्या एका खासदाराची जोरदार चर्चा रंगली असून शिंदे गटाचा हा खासदार 2024 ची निवडणूक थेट भाजपच्या चिन्हावर लढवणार असल्याचे बोललं जात आहे. शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांनी मात्र ही वस्तूस्थिती नसून आपण शिवसेना पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं आहे. तर लोकसभा निवडणुकीत मी भाजपचा उमेदवार असणार ही दिशाभूल करणारी बातमी आहे. या पारावरच्या अर्थहीन गप्पा आहेत असं म्हटलं आहे. तर आपला प्रचार महाडिक यांच्यासह भाजपचे लोक करतील, असा दावाही मंडलिक यांनी यावेळी केला. त्यामुळे काय सुरू आहे कोल्हापुरच्या राजकारणात त्यावर हा स्पेशल रिपोर्ट
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

