उद्धव ठाकरे ‘मिंधे’ झालेत, बाळासाहेबांचा नाही तर ठाकरेंनी काँग्रेसचा वारसा घेतला; शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा हल्लाबोल

हर्षदा शिनकर, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 26, 2023 | 1:14 PM

शक्तिप्रदर्शन केल्याशिवाय आता उद्धव ठाकरे काहीही करू शकत नाही, केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेत फूट पडली आणि शिवसेनेचे दोन गट पडले. शिवसेनेतील फूटीनंतर ठाकरे गटातील नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला मिंधे म्हणून संबोधले आणि त्यांच्यावर हल्लाबोल केला. मात्र यावर शिंदे गटातील नेत्याने पलटवार केला आहे. कोल्हापुरात शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेना स्वतः मिंधे झाले असल्याची टीका दीपक केसरकर यांनी केली. कोल्हापुरात दीपक केसरकर यांच्या उपस्थित प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी ही टीका केली.

हिंदुत्वापासून दूर व्हा हे कधीही बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही सांगितले नाही. उद्धव ठाकरे यांनी बाळसाहेबांचा वारसा सोडला असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा वारसा घेतल्याचा हल्लाबोलही केसरकरांनी केला. उद्धव ठाकरे आणि शिवसेना आता मिंधे झाले आहेत. ते आता फक्त काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी याच्यासह शक्तिप्रदर्शन करू शकतात. शक्तिप्रदर्शन केल्याशिवाय आता उद्धव ठाकरे काहीही करू शकत नाही, असे म्हणत केसरकरांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI