Shinde Shivsena : उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजीपार्कवर तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा कुठे?
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मुंबई महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये परवानगी दिली असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. यानंतर आता शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. दसरा मेळाव्यासाठी वरळी डोम आणि आझाद मैदान या दोन ठिकाणांची शिंदे गटाकडून पाहणी केली जात आहे. आझाद मैदानावर मेळावा आयोजित करण्यासाठी आवश्यक परवानगी मिळवण्याचा […]
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मुंबई महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये परवानगी दिली असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. यानंतर आता शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. दसरा मेळाव्यासाठी वरळी डोम आणि आझाद मैदान या दोन ठिकाणांची शिंदे गटाकडून पाहणी केली जात आहे. आझाद मैदानावर मेळावा आयोजित करण्यासाठी आवश्यक परवानगी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, आतापर्यंत शिंदेंच्या शिवसेनेला परवानगी मिळालेली नाही. ही घडामोड राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणात महत्त्वाची ठरू शकते. शिवसेनेच्या दोन गटांमधील स्पर्धा आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या तयारीकडे लक्ष वेधले जात आहे.

