शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल, काय मिळालं उत्तर?
नवी मुंबईमध्ये आज आरोग्य सेवेच्या शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्याने शिवसैनिक आक्रमक झाले.
नवी मुंबईमध्ये आज आरोग्य सेवेच्या शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्याने शिवसैनिक आक्रमक झाले. या प्रकारामुळे नवी मुंबईत राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.
कार्यक्रमासाठी सानपाडा आणि वाशी परिसरात मोठी हालचाल सुरू असतानाच शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला. वाशी येथे भाजप नेते गणेश नाईक यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांनी निषेध नोंदवला. यानंतर मोठ्या संख्येने शिवसैनिक बेलापूर येथील महानगरपालिका मुख्यालयात दाखल झाले. कर्यालयात त्यांना शांत करण्याचे आणि समजुत घालण्याचे प्रयत्न झाले.
महानगरपालिकेच्या सचिवांना “पत्रिकेत एकनाथ शिंदे यांचे नाव का टाकले नाही?” असा सवाल करत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. “सचिव मॅडम हाय हाय” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. संतप्त शिवसैनिकांनी सचिवांच्या केबिनमध्ये निमंत्रण पत्रिकाही फाडल्याची माहिती समोर आली आहे.
Published on: Jun 15, 2026 02:22 PM
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...

