shiv sangram Vinayak mete passed away: विनायक मेटेंच्या अपघाताचा पोलीस रिपोर्ट TV9च्या हाती!

चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याचं समजतंय. गाडीवरील ताबा अचानक सुटला आणि मागून डाव्या बाजूने येणाऱ्या गाडीला ही गाडी धडकली. फॉरेन्सिक टीम या सगळ्याची तपासणी करतंय.

रचना भोंडवे

|

Aug 14, 2022 | 11:57 AM

विनायक मेटेंच्या अपघाताचा पोलीस रिपोर्ट (Vinayak Mete Accident Police Report) हाती आलाय. चालकाचं नाव एकनाथ कदम, दुसऱ्या लेन मध्ये चालक गाडी चालवत होता. चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याचं समजतंय. गाडीवरील ताबा अचानक सुटला आणि मागून डाव्या बाजूने येणाऱ्या गाडीला ही गाडी धडकली. फॉरेन्सिक टीम या सगळ्याची तपासणी करतंय. कोणत्या गाडीने धडक दिली असेल याचा शोध घेतला जातोय. अपघाताची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात (Car Accident) झाल्यानं त्यांचं दुःखद निधन झालंय. त्यांच्या गाडीला पुणे-मुंबई एक्सप्रेस (Pune Mumbai Highway) हायवेवर त्यांच्या अपघात झालाय. आज मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जातीये.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें