Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिखट झाले
VIDEO | उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची आशिष शेलार यांच्यावर खोचक शब्दात टीका, कानामागून आले अन् तिखट झाले, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी आशिष शेलार यांना खोचक टोलाही लगावला
नांदेड, २९ ऑगस्ट २०२३ | उध्दव ठाकरे यांची अवस्था शोले चित्रपटामधल्या आसरानी यांच्यासारख्या एका जेलरची सारखी झाली आहे, अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. या टीकेला उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘स्वतःचा कार्यक्रम, कुठलंही धोरण नसलेला पक्ष म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष. उद्धव ठाकरे यांना आमचं सांगणं आहे की त्यांनी मर्यादा पाळावी, मर्यादा ठेवावी आणि मर्यादेत राहावं. भाजपाचा प्रामाणिकपणा हा आमचा दुबळेपणा नव्हे’, असे म्हणत आशिष शेलार यांनी थेट इशारा दिला होता. यावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी आशिष शेलार यांच्यावर टीका केली आहे, देवेंद्र फडवणीस यांनी आशिष शेलार यांचे अस्तित्व किती मर्यादित केले ते आधी त्यांनी पहावे, असा टोला सुषमा अंधारे यांनी आशिष शेलार यांना लगावलाय. इतकेच नाहीतर कानामागून आले अन् तिखट झाले, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी आशिष शेलार यांना खोचक टोलाही लगावला आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

