AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray | Eknath Shinde | ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय घडणार?

Uddhav Thackeray | Eknath Shinde | ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय घडणार?

| Updated on: Jun 16, 2026 | 11:13 AM
Share

शिवसेनेच्या स्थापनेला यंदा 60 वर्षे पूर्ण होत असून 19 जून रोजी पक्षाचा हिरक महोत्सवी वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून जोरदार तयारी सुरू असून, दोन्ही गटांमध्ये शक्तीप्रदर्शनाची चुरस पाहायला मिळत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी पक्षाने व्यापक तयारी सुरू केली असून, नुकतीच मुंबईतील आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, विविध पदाधिकाऱ्यांवर विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

यंदाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधान परिषदेत निवडून आलेल्या सदस्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. मात्र, या कार्यक्रमापेक्षा सध्या राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’चीच सर्वाधिक चर्चा रंगली आहे. ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात प्रवेश करणार का, याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचाही वर्धापन दिन सोहळा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे खासदारांच्या संभाव्य फुटीबाबत आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच ठाकरे गटाचे सर्व खासदार या कार्यक्रमाला उपस्थित राहतात का, याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दोन्ही गटांकडून होणाऱ्या शक्तीप्रदर्शनामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Published on: Jun 16, 2026 11:13 AM

Follow Us