AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shiv Sena : लवकरात लवकर सुनावणी घ्या, शिवसेनेची महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात याचिका

Shiv Sena : लवकरात लवकर सुनावणी घ्या, शिवसेनेची महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात याचिका

| Updated on: Aug 23, 2022 | 11:22 AM
Share

राज्यातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याचं सांगितलं जातंय. शिवसेना नेते सुभाष देसाई आणि माजी मंत्री अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका मेन्शन केली आहे. 

नवी दिल्ली :  शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा धाव घेतली आहे. ही धाव सत्ता संघर्षावरील सुनावणीसाठी आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचा पेच अजूनही सुटलेला नाही. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात (supreme court) सुनावणी सुरू आहे. यावर शिवसेनेकडून एक याचिका करण्यात आली आहे.  लवकरात लवकर सुनावणी व्हावी म्हणून शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. राज्यातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई (subhash desai) आणि माजी मंत्री अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका मेन्शन केली आहे. मात्र, कोर्टाच्या लिस्टमध्ये राज्यातील सत्तापेचाच्या खटल्याचा उल्लेख नाहीये. त्यामुळे आज या प्रकरणावर सुनावणी होणार की नाही? याबाबतचं चित्रं अजून स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, कोर्ट शिवसेनेच्या (shivsena) याचिकेची दखल घेऊन तारीख देते का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Published on: Aug 23, 2022 11:22 AM