Sharad Pawar | शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष,राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी शरद पवारांचं प्रशस्तीपत्र
कधी वाटलं नव्हतं शिवसेनेबरोबर आपण सरकार बनवू. शिवसेना (Shiv Sena) हा विश्वास असणारा पक्ष आहे. हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. पण हे सरकार पाच वर्ष टिकेलच, पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केला.
कधी वाटलं नव्हतं शिवसेनेबरोबर आपण सरकार बनवू. शिवसेना (Shiv Sena) हा विश्वास असणारा पक्ष आहे. हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. पण हे सरकार पाच वर्ष टिकेलच, पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने मुंबईत घेतलेल्या पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, “या देशानं अनेक पक्ष पाहिले, काही टिकले. पण राष्ट्रवादीचं हे वैशिष्ट्य आहे 22 वर्ष शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले. सत्तेत आपण होतो, सत्ता गेल्यावर काही लोक गेले. पण नवीन लोक तयार झाले”.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

