Sanjay Shirsat Video : ‘तुम्ही कितीही तारीफ करा.. तो माणूस फक्त वेळेची वाट पाहातोय’, आणखी एक नेता शिंदेंकडे येणार? शिरसाटांचा दावा काय?
शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि नेते संजय शिरसाट यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीसोबतच विविध प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांनी ऑपरेशन टायगरसह भास्कर जाधव यांच्याबद्दलही भाष्य केले.
ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेल्या गळतीनंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला विनायक राऊत, अंबादास दानवे, संजय राऊत, अनिल परब आणि इतरही काही नेते उपस्थित होते. पण भास्कर जाधव या बैठकीला नसल्यामुळे चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘भास्कर जाधव हे जेष्ठ नेते आहेत. उगाच तुम्ही इथे आले नाहीत, हे आले नाहीत ते रुसले हे फुगले ते काय एकनाथ शिंदे आहेत का?’, असा खोचक सवाल करत राऊतांनी शिंदे गटालाच फटकारल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेवर बोलताना शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी राऊतांवर पलटवार केलाय. “भास्कर जाधव यांनी तुमची भूमिका आवडत नाही, हे वारंवार सांगितलेला आहे. भास्कर जाधव हा रांगडा माणूस आहे. शिंदे साहेबांच्या स्वभावाला मॅच असणारा माणूस आहे. तुम्ही कितीही त्याच्या आरती ओवाळायचा प्रयत्न केला तरी सुद्धा भास्कर जाधव तुमच्याकडे आता राहणार नाही, असा चित्र तयार झालेलं आहे. तो माणूस फक्त वेळेची वाट पाहत आहे”, असे संजय शिरसाट यांनी म्हटले. तर “भास्कर जाधव तुमच्या बरोबर राहणार नाहीत. तुम्ही कितीही तारीफ करून, साहेब म्हणून काहीही केलं तरी आता भास्कर जाधव त्यांच्याबरोबर राहणार नाही हे जवळपास आता निश्चित झालेला आहे”असा दावाही शिरसाट यांनी केला.

संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर

राणेंनी आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली, 'त्याला आधी कंठ तरी फुटू दे...'

राडा, जाळपोळ.. अन् तणावपूर्ण शांतता; नागपुरात 11 ठिकाणी संचारबंदी

मुख्यमंत्र्यांचा नागपूरच्या जखमी पोलिसांना व्हिडिओ कॉल
