मिस्टर राज यू आर नॉट माय टार्गेट, तर माझं टार्गेट महाराष्ट्र नासवणारे… सुषमा अंधारेंचा कुणावर हल्लाबोल?
राज ठाकरे हा माझा अजिबात विषय नाही पण अडचण काय झाली त्यांना जी सुपारी मिळाली होती एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पहिली सुपारी माझ्या नावाची होती. महायुतीने माझा धसका घेतलाय राज ठाकरे माझं कधीही टार्गेट नव्हतं, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल काय?
राज ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांचा एक व्हिडीओ दाखवून त्यांनी सडकून टीका केली. तर यालाच प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंचे जुने व्हिडीओंचा सपाटा लावला. यानंतर मुंबईत पुन्हा सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंचं नाव घेत हल्लाबोल केला इतकंच नाहीतर देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. सुषमा अंधारे म्हणाल्या, राज ठाकरे हा माझा अजिबात विषय नाही पण अडचण काय झाली त्यांना जी सुपारी मिळाली होती एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पहिली सुपारी माझ्या नावाची होती. महायुतीने माझा धसका घेतलाय राज ठाकरे माझं कधीही टार्गेट नव्हतं, असं त्यांनी म्हटलं. तर मी राज ठाकरेंना मानतही नाही. राज ठाकरे हे माझ्यावर बोलले म्हणून माझा हिसका दाखवला मी त्यांच्यावर बोलतही नाही माझं टार्गेट हे इथले कळसूत्री बाहुल्या हलवणारे देवेंद्र फडणवीस हे टार्गेट असल्याचे सुषमा अंधारे म्हणाले. बघा काय केला राज ठाकरे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल?
Published on: May 15, 2024 12:38 PM
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
