अजित पवारांना शून्य जागा, सुनेत्रा पवार जिंकणार की हरणार? पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
राज्यात अजित पवारांची राष्ट्रवादी एकाही जागेवर विजयी होणार नाही, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. महाराष्ट्रात अजित पवारांना शून्य जागा तर बारामतीत सुनेत्रा पवार जिंकणार की हरणार? पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा काय? बघा काय म्हणाले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण?
सत्ता बदल होणार असा मोठा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. दरम्यान, राज्यात अजित पवारांची राष्ट्रवादी एकाही जागेवर विजयी होणार नाही, असा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. टिव्ही ९ मराठीशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आम्ही नुसत्या घोषणा करत नाही. २०१९ मध्ये भाजपला प्रत्येक राज्यात किती जागा आल्यात हे पाहिलं तर कोणत्या राज्यात भाजपचा आकडा यंदा २०१९ च्या तुलनेत वाढेल? भाजप दावा करतंय की, बंगाल आणि उत्तरप्रदेशात आमचा उमेदवार विजयी होईल. पण इतर ठिकाणी तुम्ही अव्वल आहात. त्यामुळे कुठं वाढणार याचा अंदाज नाही. आम्ही सांगू शकतो आम्ही कोणत्या जागा जिंकणार? कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजराज, तेलंगणा, हरियाणा, दिल्ली या जागा जिंकणार असल्याचा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तर यावेळी राज्यात अजित पवार यांना शून्य जागा मिळणार असून बारामतीत सुनेत्रा पवार हरणार असल्याचा दावाही केला.
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
