AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'मविआ'ला 35 जागा तर 'इंडिया'ला बहुमत, शरद पवारांनंतर पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

‘मविआ’ला 35 जागा तर ‘इंडिया’ला बहुमत, शरद पवारांनंतर पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: May 15, 2024 | 11:10 AM
Share

इंडिया आघाडीला 240-260 जागा मिळतील आणि केंद्रात सत्ताबदल होणार असल्याचे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या संवादात पृथ्वीराज चव्हाण यांनी इंडिया आघाडीला 240-260 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. बघा नेमकं काय म्हणाले?

येत्या ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र आतापर्यंत तीन नेत्यांनी जागांचा अंदाज वर्तवला आहे. अशातच काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही महाविकास आघाडीला किती जागा मिळणार याचा थेट दावाच केला आहे. महाराष्ट्रसह देशात अजून काही मतदानाचे टप्पे बाकी असताना ४ जूनच्या निकालापूर्वीच भाकितं सुरू झाली आहेत. नवा दावा काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. विशेष म्हणजे शरद पवारांसह रोहित पवारांनीही किती जागा मिळणार याचा आकडा घोषित केला होता. पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीला ३२ ते ३५ जागा मिळणार असल्याचा दावा केला. म्हणजेच महायुतीला १३ ते १८ जागा मिळू शकतात. शरद पवार यांनी सांगितले महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा आणि महायुतीला १३ ते १८ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. राज्यात आणखी एका टप्प्यातील मतदान बाकी असताना मविआ नेत्यांचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढलाय. बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: May 15, 2024 11:10 AM
Follow Us