‘ते’ काय करतील माहित नाही, म्हणून…, अजित पवारांना शिंदेंच्या मंत्र्यांचा टोला
सध्या गुलाबराब पाटील यांचा एक व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत असून त्यांनी त्यात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर निशाना साधला आहे.
जळगाव : शिवसेना नेते आमदार गुलाबराव पाटील हे त्यांच्या वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत असतात. आताही ते त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आहेत. त्यांचा सध्या एक व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत असून त्यांनी त्यात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर निशाना साधला आहे. गुलाबराब पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघातील एका विवाह सोहळ्यात हजेरी लावली. यावेळी त्यांनी पवार या नावारवरून टोलेबाजी केली. आम्ही पवारांना घाबरुनच असतो. कारण तुम्ही सकाळी-सकाळी शपथ घेता आणि काय करुन टाकता याचे काही सांगता येत नाही. त्यामुळे पवारांना कायम बरोबर ठेवावे लागते. कारण पवारांची बुद्धी चालते तशी कोणचीही चालत नाही, असा टोलाही गुलाबराव पाटील. त्यानंतर विवाह सोहळ्यात एकच हशा पिकला.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका

