AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मातोश्रीबाहेर शिवसेनेची बॅनरबाजी, उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न

मातोश्रीबाहेर शिवसेनेची बॅनरबाजी, उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न

| Updated on: Feb 26, 2023 | 12:34 AM
Share

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरच्या मुद्द्यावर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मातोश्रीसमोर शिंदे गटाकडून बॅनर लावण्यात आले आहेत.

मुंबई : मातोश्री ( Matoshree ) समोर पुन्हा एकदा शिवसेनेकडून ( Shiv sena ) उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतरण झाल्यानंतर उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी केलेल्या टीकेवर शिंदे गटाकडून बॅनर्सच्या माध्यमातून उत्तर देण्यात आले. छत्रपती संभाजीनगर ( Chhatrapati Sambhajinagar ) सोबतच धाराशिव ( Dharashiv )हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्यामुळे झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलं असा आशयाचा बॅनर मातोश्रीसमोर लावण्यात आला आहे.

अफजल खानची कबर फोडून दाखवली, गडावर शिवजयंती साजरी करून दाखवली, गडकिल्ल्यांसाठी महामंडळ स्थापन करून दाखवलं आणि औरंगाबाद ( Aurangabad ) तसेच उस्मानाबाद ( Osmanabad ) यांचे देखील नामांतर शिंदे यांनीच करून दाखवलं असा बॅनर उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर लावण्यात आले आहे.

( राज्यातील आणि जगभरातील ताज्या बातम्या मराठीत ( Marathi News ) वाचण्यासाठी Tv9 Marathi च्या वेबसाईटला फॉलो करत राहा. महत्त्वाच्या बातम्या ( Latest Marathi news ) सर्वात आधी तुम्हाला पाहण्यासाठी आमच्या TV9 marathi Live या Youtube चॅनेलला फॉलो करा. )

Published on: Feb 25, 2023 07:16 PM