छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभेसाठी शिवसेना पुरस्कृत उमेदवारी

छत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambhajiraje) यांना शिवसेना पुरस्कृत राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे. टीव्ही ९ ला सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 22, 2022 | 2:47 PM

छत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambhajiraje) यांना शिवसेना पुरस्कृत राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे. टीव्ही ९ ला सूत्रांनी ही माहिती दिली आहे. संभाजीराजेंना सहावी जागा देण्यासाठी महाविकास आघाडीतून शिवसेनेवर (Shivsena) दबाव होता. त्यातून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यापूर्वी छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत आले तरच त्यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडली होती. तर या प्रकरणात संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Cm Uddhav Thackeray) भेटही घेतली होती.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें