नाशकातील दाखल गुन्हावर राऊत शिंदे-फडणवीस यांच्यावर भडकले; म्हणाले, साफ कचरा…
त्यांच्यावर नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावरून राऊत हे आता भडकले आहेत. त्यांनी, गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता.
मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करण्यापासून महाविकास आघाडीवर येणाऱ्या प्रत्येक संकटाच्या ते समोर उभे असतात. त्यातच ते सातत्याने वेगवेगळी वक्तव्ये करत असतात. याचदरम्यान त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती. त्यांनी हे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांचा आदेश पाळू नका असं आवाहन केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावरून राऊत हे आता भडकले आहेत. त्यांनी, गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे “गठन”बेकायदेशीर ठरले आहे. व्हिप पासून शिंदे यांना गटनेते पदी निवड करण्यापर्यंत सगळेच घटना विरोधी ठरवले आहे. सोळा आमदार कोणत्याही क्षणी अपात्र ठरविले जातील अशी स्थिती आहे. बेकायदेशीर सरकारचे आदेश प्रशासनानं पाळू नयेत. भविष्यात खटले दाखल होतील. असे मत मी व्यक्त केले. हा अपराध आहे का? सरकारने थेट गुन्हाच दाखल केला. मी कारवाईला घाबरत नाही. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला आहे. या हुकूमशाही प्रवृत्तीशी लढावेच लागेल, असा घणाघात त्यांनी केला आहे.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

