उदय सामंतांच्या फुटीच्या दाव्याला बळ? ठाकरे गटाच्या मेळाव्याला आजी-माजी आमदार, खासदारांची दांडी तर....

उदय सामंतांच्या फुटीच्या दाव्याला बळ? ठाकरे गटाच्या मेळाव्याला आजी-माजी आमदार, खासदारांची दांडी तर….

| Updated on: Jan 24, 2025 | 1:30 PM

उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला काही आजी आणि माजी आमदार, खासदारांची अनुपस्थिती पाहायला मिळाली. यामुळे मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या फुटीच्या दाव्याला बळ मिळतंय का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला काही आजी आणि माजी आमदार, खासदारांची अनुपस्थिती पाहायला मिळाली. यामुळे मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या फुटीच्या दाव्याला बळ मिळतंय का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. माजी आमदार राजन साळवी, वैभव नाईक अनुपस्थित असल्याने अनेक चर्चा सुरू होत्या. तर खासदार ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील हे देखील उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला गैरहजर असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला माजी आणि आजी आमदार खासदारांनी दांडी मारल्याने सुरू असलेल्या चर्चांदरम्यान या नेत्यांनीच टीव्ही ९ मराठीली स्पष्टीकरण दिल्याचे पाहायला मिळत आहे. दिलीप सोपल हे तब्येत बरी नसल्याने मेळाव्याला नव्हते. बाबाजी काळे हे पूर्व नियोजित दौऱ्यामुळे मेळाव्यात अनुपस्थित होते. राहुल पाटील राज्यपालांचा कार्यक्रम असल्याने मेळाव्यात गैरहजर होते. तर राजन साळवी हे देखील एका नियोजित कार्यक्रमामुळे मेळाव्याला हजर राहू शकले नाहीत. वैभव नाईक हेही सिंधुदुर्गात नियोजित कार्यक्रम असल्याने मेळाव्यात दिसले नाहीत. तर खासदारांची कारणं काय?

Published on: Jan 24, 2025 01:18 PM