Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2024 साली मोदी पंतप्रधान नसतील ही शिवसेनेची गॅरंटी, संजय राऊत यांचा दावा

2024 साली मोदी पंतप्रधान नसतील ही शिवसेनेची गॅरंटी, संजय राऊत यांचा दावा

| Updated on: Feb 11, 2024 | 7:10 PM

मी गेले बारा दिवस मुख्यमंत्र्याचे गुंडासोबतचे फोटो शेअर करीत आहे, कल्याणमधील भाजपाच्या आमदाराने गोळ्या झाडल्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांमुळे गुन्हेगार झालो. आपले लाखो करोडो रुपये मुख्यमंत्र्यांकडे पडून आहेत असे जाहीरपणे कोर्टात बोलतोय परंतू मुख्यमंत्र्याची ईडी चौकशी होत नाही असा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला. या देशाचा पंतप्रधान भ्रष्टाचार सहन करणार नाही म्हणतो. पण सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराला उत्तेजन प्रेरणा देत असतील तर ते हे लोक असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

मुंबई | 11 फेब्रुवारी 2024 : भाजपाचे नेते देशातील लोकांना एका विचाराने धुंद करुन राज्य करीत आहेत. पन्नास पैशांची चिलीम मारून जी नशा येते त्या नशेत भाजपाचे लोक बोलत असतात. त्यांना देशातील बेरोजगारी, महागाई, अत्याचार, बलात्कार, खून दिसत नाहीत का? या नशेतून लोकांनी बाहेर पडले पाहीजे असे खासदार संजय राऊत यांनी येथे बोलताना सांगितले. मुंबईत हत्या होत आहेत. आपल्या घरापर्यंत मुलांपर्यंत हे सर्व पोहचले आहे. नगरच्या राहुरीत वकील सुशिक्षित आढाव दाम्पत्याचे अपहरण करुन संपविण्यात आले. काल पुण्यात निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांच्यावर खूनी हल्ला झाला. या राज्यातील गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलं का ? हे गुंडाचे राज्य आहे. रामाचे मंदिर झाले असले तरी हे राम राज्य नाही असेही राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्राला दिल्लीने पायपुसणे केले आहे. कोणीही या महाराष्ट्राला लुटा, बदनामी करा असे केंद्राचे धोरण आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र शिवसेनेकडे आशेने पाहात आहे. कधीही निवडणूका घ्या 2024 साली मोदी पंतप्रधान नसणार ही शिवसेनेची गॅरंटी आणि वॉरंटी आहे. भाजपा आणि त्यांचे गट 220 ते 225 चा आकडा पारच करु शकत नाही. महाराष्ट्रात 35 जागा इंडिया आघाडी जिंकतेय. कर्नाटकात संपूर्ण कॉंग्रेस आणि मित्रपक्ष जिंकणार आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, आंध्रप्रदेश, झारखंड एकहाती इंडीया जिकतेय असेही ते म्हणाले.

Published on: Feb 11, 2024 07:09 PM