मुंबई: राज्यसभा निवडणूक (Rajyasabha Election) जसजशी जवळ येतीये तसतसं राजकीय पक्ष (Political Parties) कंबर कसताना दिसून येतायत. रोज काही ना काही राजकीय घटना घडतायत. आज भाजपाची (BJP) निवडणूक रणनीती आखण्यासाठी खास बैठक बोलाविण्यात आली होती. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत ही बैठक पार पडली. कोरोनाची लागण झाली असल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान ही बैठक झाल्यानंतर राज्यसभा निवडणुकीत भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येणारच असा विश्वास भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केलाय.