Anjali Damania Video : “पैसे दे नाहीतर मारून टाकीन”, कराडला कोणी दिली धमकी अन् खंडणी केली वसूल; दमानियांचा ट्वीटनं खळबळ
संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माईंड असलेल्या वाल्मिक कराडकडून १५ लाखाची खंडणी शिवराज बांगर यांनी वसुल केली होती, अशी माहिती अंजली दमानिया यांनी ट्वीट करून दिली.
वाल्मिक कराडकडून १५ लाखांची खंडणी शिवराज बांगर यांनी वसूल केली होती, अशी माहिती समोर आणणारं एफआयआर बाहेर आलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडसंदर्भात एक ट्वीट केलं आहे. यानंतर एकच चर्चांना उधाण आलं आहे. अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी वाल्मिक कराडकडून १५ लाखाची खंडणी शिवराज बांगर यांनी वसुल केली होती, असा FIR बाहेर आला आहे, असं म्हटलंय तर वारंवार समक्ष भेटून व व्हॉट्सअप कॉल वरून, “पैसे दे नाहीतर तुला मारून टाकीन” अशी धमकी शिवराज बांगर यांनी दिली, अशी माहितीही अंजली दमानिया यांनी दिली आहे. तर १५ लाख वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून, जगमित्रच्या लॉकर मधून देण्यात आले? वाल्मिक कराडला कोणी धमकी देऊ शकतं होत हे माझ्या बुद्धीला पटत नाही, असंही त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून थेट म्हटलंय.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

