Headline | 4 PM | शिवसेना भवनाजवळ राम मंदिर प्रश्नानवरुन भाजप शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा

भाजपनं काढलेल्या या फटकार मोर्चावेळी शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या आंदोलनावरुन राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप करून शिवसेना उर्फ ​​सोनिया सेनेने हिंदू धर्म, हिंदू धार्मिक स्थळ आणि हिंदूंच्या श्रद्धा आणि आस्था यांचा अपमान केला आहे. भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईतर्फे तेजिंदिरसिंग यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेच्या विरोधात “फटकार मोर्चा” आयोजित करण्यात आला होता. भाजपनं काढलेल्या या फटकार मोर्चावेळी शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या आंदोलनावरुन राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजप कार्यालयाबाहेरही आंदोलन झाली. आंदोलकांच्या अंगावर जाणार त्यांना मारहाण करणार, धाक दपटशाह करणं योग्य नाही, मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, असं प्रविण दरेकर म्हणाले. काही कार्यकर्त्यांची कपडे फाडली असल्याचं समोर आलं आहे.

जो विषय गाजतोय त्याची चौकशी करावी एवढीच भूमिका घेतली. कायदा आणि सुव्यवस्था मानता तर रस्त्यावर येण्याची गरज काय आहे. संयमी क्रिया नसेल तर प्रतिक्रिया संयमी कसे असेल, असं शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI