Dadara Nagar Haveli | दादरा नगर-हवेलीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकरांचा विजय, मुंबईत जल्लोष

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी घुमली. शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा प्रचंड विजय झाला. तब्बल 50 हजाराच्या मताधिक्याने डेलकर विजयी झाल्या. शिवसेनेचा हा महाराष्ट्राबाहेरचा पहिलाच विजय असून या निमित्ताने शिवसेने महाराष्ट्राबाहेर विजयाचं खातं खोललं आहे.

दादरा नगर हवेलीतील माजी खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यामुळे लोकसभेची ही जागा रिक्त झाली होती. कलाबेन डेलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेने कलाबेन यांना तिकीट दिलं होतं. आज झालेल्या मतमोजणीत कलाबेन यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार महेश गावीत यांचा 47 हजार 447 मतांनी पराभव केला.

आज सकाळी साडे आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण 22 राऊंड पार पडले. यावेळी कलाबेन यांना एकूण 1,12,741 मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार महेश गावीत यांना 63 हजार 382 मते मिळाली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI