AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | शिवसेनेच्या आमदारांचा कॉंग्रेसला नकार?

Special Report | शिवसेनेच्या आमदारांचा कॉंग्रेसला नकार?

| Updated on: Jun 19, 2022 | 10:07 PM
Share

शिवसेनेचे आमदार काँग्रेसला मतं देण्यास तयार नसल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात आल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीत नेमकं काय होणार याकडे आता साऱ्यांचेच लक्ष आहे.

राज्यसभेला मतांची गरज ज्या प्रकारे कॉंग्रेसला होती त्याच प्रमाणे शिवसेनेला होती, तर आताही तिच परिस्थिती समोर आहे. विधान परिषदेसाठी भाजपकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यासाठी भाजप-काँग्रेसमध्ये लढत होत आहे. त्यामुळे ही लढत आता अटीतटीची होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकमेकांच्या आमदारांना फोन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीसह फोडाफोडी सुरू झाल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेकडे अतिरिक्त चार मतांसाठी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याकडे 44 मतं असून त्यांना विजयासाठी आवश्यक 26 मतांची आवश्यकता आहे. त्यातच शिवसेनेचे आमदार काँग्रेसला मतं देण्यास तयार नसल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात आल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीत नेमकं काय होणार याकडे आता साऱ्यांचेच लक्ष आहे.

Published on: Jun 19, 2022 10:07 PM