बघा, ठाकरे सरकारमधल्या मंत्र्याची सरळ सरळ हिंदी भाषेत धमकी, VIDEO

"मुंबईत यावच लागेल. एकना एक दिवस मुंबईत यावच लागेल. मुंबईत येतील, त्या दिवशी अर्ध्यापेक्षा जास्त शिवसेना भवनात दाखल होतील. अर्ध्यांना विमानतळाबाहेरच येऊ देणार नाही"

दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 27, 2022 | 2:14 PM

मुंबई: “मुंबईत यावच लागेल. एकना एक दिवस मुंबईत यावच लागेल. मुंबईत येतील, त्या दिवशी अर्ध्यापेक्षा जास्त शिवसेना भवनात दाखल होतील. अर्ध्यांना विमानतळाबाहेरच येऊ देणार नाही” अशी धमकी शिवसेना नेते आणि मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी दिली. “महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तन करायच असेल, तर महाराष्ट्राच्या भूमीत, मुंबईत याव लागेल. शिवसेना (Shivsena) विशाल संघटना आहे. संपूर्ण विमानतळाला 24, तास 48 तास घेराव घालण्याची शिवसेनेची क्षमता आहे, ही ताकत शिवसेनेची आहे. हे त्यांना माहित आहे, म्हणून ते घाबरतायत. बघू त्यांच्यात किती क्षमता, संयम आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे सहकारी यायला घाबरणार नाही, तर काय करणार? इतिहासात जेव्हा असं कधी घडलय, तेव्हा शिवसेना अजून वेगाने उसळून वर आलीय” असं सुभाष देसाई म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें