Sanjay Raut Uncut | भाजपविषयी गोव्याच्या जनतेत संताप – संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीव्ही9 मराठीशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी गोव्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगापासून ते महाराष्ट्रातील राजकारणापर्यंतच्या विविध प्रश्नांची त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
पणजी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून विरोधकांनी सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांची पिसे काढली आहेत. दोन-चार पादरेपावटे फुसफुसले म्हणजे सरकारला आग लागत नाही, असा हल्लाबोलच शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीव्ही9 मराठीशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी गोव्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगापासून ते महाराष्ट्रातील राजकारणापर्यंतच्या विविध प्रश्नांची त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. आघाडी सरकार स्थिर राहणार का? याबाबत चर्चा सुरू आहे, याविषयी विचारताच, विरोधी पक्षातील दोन चार पादरे पावटे फुसफूसले म्हणून काय या सरकारला आग लागत नाही. पक्षातले आणि सरकारमधले यात फरक असतो, असं राऊत म्हणाले.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
