Uday Samant : … म्हणून एकनाथ शिंदेंनी ‘जय गुजरात’ म्हटलं, उदय सामंतांनी सांगितलं नेमकं कारण
'मराठी भाषेला अनेकांग आहे. एकनाथ शिंदेंनी यावरून मला डिवचलं असं म्हणता येणार नाही. आमची चेष्टा सुरू असते हे राजकारणापलिकडचं नातं असतं', असं उदय सामंत म्हणाले.
पुण्यात जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन समारंभ पार पाडला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिल्याचे पाहायला मिळाले. पुण्यात दिलेल्या जय गुजरात घोषणेवरून एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांकडून टीकेचे बाण सोडल जात आहेत. यानंतर शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या जय गुजरातच्या वक्तव्यावर भाष्य करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘ज्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणाले तो गुजराती समाजाचा कार्यक्रम होता. त्यांना आनंद मिळावा म्हणून शिंदेंनी तो शब्द प्रयोग केला. महाराष्ट्र काय आहे हे शिंदेंनी माहिती आहे आणि शिंदे काय आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. ते शिवसेनेच्या सभेत बोलले नाहीत’, असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गुजरातच्या वक्तव्यावर दिलंय.

एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरात का कोरलं जाणार?

गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर

माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा

हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
