शिंदेंचे 2 मंत्री दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण आलं समोर
उदय सामंत आणि शंभुराज देसाई हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी ते दिल्ली दौऱ्यासाठी निघणार आहेत.
उदय सामंत आणि शंभुराज देसाई हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी ते दिल्ली दौऱ्यासाठी निघणार आहेत. शंभुराज देसाई हे खात्या संदर्भात बैठका असल्याने दिल्ली दौऱ्यावर आहेत. तर शिवसेना पक्ष, चिन्ह या संदर्भात उदय सामंत हे दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत.
शिंदेसेनेचे 2 मंत्री आज दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याने त्यांच्या या दौऱ्याची आता चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील ते भेट घेणार आहेत. राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये तीन पक्षात समन्वय नसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्ली दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी देखील गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांवर होणारे आरोप पाहता त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे. त्यामुळे महायुतीत काहीसा संभ्रम निर्माण झालेला बघायला मिळत आहे. अशातच आता शिवसेनेच्या दोन मंत्र्यांचा दिली दौरा होत असल्याने त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

