Sanjay Gaikwad : कॅन्टिनचा परवाना रद्द अन् संजय गायकवाडांना क्लिन चीट? प्रकरण नेमकं काय?
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या मारहाणीला गैर ठरवलं असलं तरी त्यांचे आमदार त्यांच्या पक्षप्रमुखाच्या मताशी सहमत नाहीत. अद्यापही आमदारांच्या या मारहाणीवर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे उद्या जनतेला जर रस्ते सुविधा निकृष्ट मिळाल्या तर जनतेनेही गायकवाडांप्रमाणेच मारहाण करायची का? असा प्रश्न विचारला जातोय.
निकृष्ट जेवणावरून मंत्रालय कॅन्टीनचा परवाना सरकारने रद्द केला. मात्र कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करणाऱ्या संजय गायकवाड यांच्यावर अद्याप साधा गुन्हाही दाखल झालेला नाही. खुद्द मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेनी मारहाणीला गैर ठरवलं पण त्यांचे आमदार राज्याच्या प्रमुखांना जुमानत नाहीत. उलट आपण केलेली मारहाण योग्यच असल्याचा दावा गायकवाडांचा आहे आणि सरकार सुद्धा नेहमीप्रमाणे शाब्दिक निषेध नोंदवून कारवाईवर मौन झालंय. जेवण निकृष्ट मिळालं म्हणून सत्तेतील आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारलं. मात्र उद्घाटनाच्या २४ तासांनंतर डोंबिवलीच्या पुलाचे तीन तेरा वाजले. या निकृष्ट दर्जाच्या कामावरून लोकांनी कोणाच्या कानशिलात मारायची? असा सवाल सध्या केला जातोय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

