Old Pension Scheme : संपकरी कर्मचाऱ्यांवरील ‘त्या’ वक्तव्यावर संजय गायकवाड यांच्याकडून घुमजाव
VIDEO | 'आम्ही सर्व संपकरी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहोत, फक्त टोकाची भूमिका घेऊ नका', असे म्हणत संजय गायकवाड यांनी केलेल्या 'त्या' वक्तव्यावर काय दिलं स्पष्टीकरण बघा...
मुंबई : ‘कोणता सरकारी कर्मचारी पगारावर अवलंबून आहे. त्यांच्या घरात पैसा ठेवायला जागा नाही. ९५ टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई आहे.’, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीवर ठाम असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना उद्देशून केले आहे. या वक्तव्यानंतर संजय गायकवाड यांना चांगलाच टीकेचा सामना करावा लागत आहे. अशातच संपकरी कर्मचाऱ्यांवरील केलेल्या वक्तव्यावर संजय गायकवाड यांच्याकडून घुमजाव करण्यात आला आहे. ‘माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवलं, काहींनाच उद्देशून मी हे माझं वक्तव्य केले आहे. तर सगळ्या कर्मचाऱ्यांना ते बोललो नाही.’, असे म्हणत संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली

