Arvind Sawant | भाजपचं उपकार्यालय म्हणजे ईडी, अरविंद सावंतांची घणाघाती टीका

यंत्रणांचा राजकीय वापर सुरु आहे. ईडीचा राजकीय वापर करण्यात येत आहे. ईडी हे भाजपचं उपकार्यालय आहे, असं टीकास्त्र शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सोडलं आहे.

यंत्रणांचा राजकीय वापर सुरु आहे. ईडीचा राजकीय वापर करण्यात येत आहे. ईडी हे भाजपचं उपकार्यालय आहे, असं टीकास्त्र शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सोडलं आहे. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना न्याय मिळाला पाहिजे. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेसोबत इतर बँकांचं बोला. शिवसेनेला बदनाम करण्याचं कारस्थान करण्यात येत आहे. अनिल परब हे ईडीच्या चौकशीला सामोरं जातील त्यांच्यात ती क्षमता आहे. बिहार, उत्तर प्रदेश या राज्यात देशातील भ्रष्टाचाराचा कळस आहे तिथं त्यांची सत्ता आहे त्यामुळं तिथं कारवाई होत नाही,  असं अरविंद सावंत म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थ आहेत. रवी राणा यांच्यावर आरोप आहेत. रवी राणानं बीएसएनएलची जमीन हडप केली आहे. नवनीत राणा या सुप्रीम कोर्टात केस पराभूत होत आल्यात त्यामुळे  ही कारवाई करण्यात येत आहेत.  आनंदराव अडसूळ हा छातीवर वार घेतलेला माणूस आहे. सोमय्यांनी यांनी यापूर्वी कोकणातल्या नेत्यावर केलेल्या आरोपाचं काय झालं, असा सवाल अरविंद सावंत यांनी केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI