Hemant Patil | महाविकासआघाडीत आमचं 100 टक्के नुकसान होतंय, शिवसेना खासदार हेमंत पाटील यांचा आरोप

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Yuvraj Jadhav

Updated on: Dec 18, 2021 | 12:27 PM

महाविकास आघाडी मध्ये आमच शंभर टक्के नुकसान होत आहे. आमचा वापर केला जात असल्याची खंत शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केलीय. 

महाविकास आघाडी मध्ये आमच शंभर टक्के नुकसान होत आहे. आमचा वापर केला जात असल्याची खंत शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केलीय.  या  बाबी वरिष्ठांच्या कानावर घातल्या आहेत.  केवळ उध्दव ठाकरे यांचे आदेश आहेत. त्यामुळं सगळ सहन करत असल्याचं वक्तव्य पाटील यांनी केलय. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री नसले असते तर तुम्ही कुठे असता असा सवाल करत आम्ही आहोत म्हणून सरकार आहे असा कुणीही गर्व करु नये अशी टीका शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर केली. चव्हाण यांनी आम्ही आहोत म्हणून सरकार आहे, असं म्हटलं होतं त्याला पाटील यांनी प्रतिउत्तर दिलय.  पाटील काल नांदेड मध्ये बोलत होते.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI