Jitendra Awhad Video : आलमगीर औरंगजेब हा आव्हाडांचा दैवत? ‘जितूमियाँ’ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात औरंगजेबाच्या कबरीवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसताय. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाज यांच्यावर सडकून टीका केली.
राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसताय. नुकतीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत मोठी मागणी करत ‘औरंगजेबाची कबर नष्ट करा’ असं म्हटले. यानंतर नरेश म्हस्के यांनी शरद पवार यांच्या गटातील आमदार जितेंद्र आव्हाज यांच्यावर सडकून टीका केली. ‘जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेब हे त्यांचं दैवत असल्याचे मान्य केलंय.’ इतकंच नाहीतर नरेश म्हस्के यांच्याकडून जितेंद्र आव्हाड यांचा जितूमियाँ असा देखील उल्लेख करण्यात आला आहे. तर जितेंद्र आव्हाड हे औरंगजेबाची पूजा करण्याची भाषा करताय असंही नरेश म्हस्के यांनी म्हणत जोरदार घणाघात केलाय. आलमगीर औरंगजेबाच्या कबरीला हटवण्यासंदर्भात भाष्य करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘तुम्हाला औरंगजेबाची कबर काढायची तर काढा ठेवायची तर ठेवा.. तुम्ही असं म्हणाल की हिटलरचं नाव पुसून आम्हाला दुसरं महायुद्ध समजावून सांगा… तुम्ही रावण बाजूला काढा आणि राम समजावून सांगा… काहीही करतील सत्ताधारी आता’, असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली. यावरच नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर देत जितेंद्र आव्हाड यांच्यावर घणाघात केलाय.
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर

