Naresh Mhaske Video : ‘…गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा’, शिवसेनेच्या खासदाराची लोकसभेत मोठी मागणी
औरंगजेबाच्या कबरीवरून आरोप-प्रत्यारोप होत असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत मोठी मागणी केल्याचे पाहायला मिळाले
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात औरंगजेबाच्या कबरीवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसताय. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत मोठी मागणी केली आहे. ‘औरंगजेबाची कबर नष्ट करा’, अशी मागणी नरेश म्हस्के यांनी लोकसभेत केल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर औरंगजेबाची कबर संरक्षित कऱण्याची गरज काय? असा संतापजनक सवाल देखील नरेश म्हस्के यांनी यावेळी केलाय. दरम्यान, औरंगजेबाने क्रूरपणे छत्रपती संभाजी महारांजाची हत्या केली, असं वक्तव्य देखील नरेश म्हस्के यांनी केलंय. ‘महाराष्ट्र राज्य हे विकसित राज्य आहे. तशी त्याची कायम ओळख राहिली आहे. पण ती ओळख पाच ते दहा लोकांनी पुसून टाकली आहे.’, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे तर याच काही लोकांनी पूर्णपणे महाराष्ट्र राज्याला विद्रूप केलं आहे. हे अत्यंत दुखःद आहे, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

