लाचार शब्द ज्यांना लागू होतो ती‌ व्यक्ती म्हणजे राणे, विनायक राऊत यांची बोचरी टीका

लोकशाहीत लाचार शब्द लागू होतो, ती‌ व्यक्ती म्हणजे नारायण राणे, असा आरोप विनायक राऊतांनी केला. एक वर्षात त्यांचा पक्ष बुडवला. सत्तेसाठी, स्वार्थासाठी लाचारी म्हणजे राणे असल्याचंही राऊत म्हणाले.

देशाने, मुंबई, पुण्याने एक कोटीचा आकडा पार केला ही आनंदाची बातमी आहे. नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरेंसह सर्वांचे अभिनंदन करतो. देशाचे आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि आरोग्य कर्मराचारी यांचही अभिनंदन करतो, असं विनायक राऊत म्हणाले. डिसेंबरपर्यंत ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करणं आवश्यक आहे. सरकारचे लसीकरण करणे काम आहे. तरुणांसह हे लसीकरण झाले पाहिजे. तरच कोरोना मुक्त देश होईल, असंही राऊत म्हणाले. लोकशाहीत लाचार शब्द लागू होतो, ती‌ व्यक्ती म्हणजे नारायण राणे, असा आरोप विनायक राऊतांनी केला. एक वर्षात त्यांचा पक्ष बुडवला. सत्तेसाठी, स्वार्थासाठी लाचारी म्हणजे राणे असल्याचंही राऊत म्हणाले. शिवसैनिक नव्हे; ठाकरे मुख्यमंत्री हे राणेंचे बेताल वक्तव्य आहे, उद्धव ठाकरे हे देखील शिवसैनिकच आहे. म्हणून ही आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे, असही राऊत म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI