आणखी 2 ते 4 खासदार आणि 7 ते 8 आमदार आमच्यासोबत येणार
मराठवाडा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही शिंदे गटात सामील झालो आहोत. आता शिवसेनेचे अर्जुन खोतकरही शिंदे गटात सामील होत असतानाच अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, त्यांच्यासोबतच शिवसेनेतील आणखी दोन ते चार खासदार आणि सात ते आठ खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याचेही बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
मराठवाडा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही शिंदे गटात सामील झालो आहोत. आता शिवसेनेचे अर्जुन खोतकरही शिंदे गटात सामील होत असतानाच अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, त्यांच्यासोबतच शिवसेनेतील आणखी दोन ते चार खासदार आणि सात ते आठ खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याचेही बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले. मराठवाड्यातील मागास भागाचा विकास करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांच्या कामाना चालना देण्यासाठी आम्ही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आलो आहोत, त्याचप्रमाणे अर्जुन खोतकरही आमच्यासोबत आले आहेत अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सांगितले की, अर्जुन खोतकर माझे चांगले मित्र आहेत, भविष्यात होणाऱ्या कार्यक्रमात त्यांचा भव्य स्वागत करुन त्यांचे अभिनंदन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

