AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | शिवसेना महाराष्ट्र पार करून दिल्लीत पोहचलीय : संजय राऊत

Sanjay Raut | शिवसेना महाराष्ट्र पार करून दिल्लीत पोहचलीय : संजय राऊत

| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 12:11 PM
Share

जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळेला लोक म्हणत होते की शिवसेना मुंबई-ठाण्याच्या पुढे जाणार नाही. पण शिवसेना महाराष्ट्रभर पसरली, आता महाराष्ट्राच्या सीमा पार करून दिल्लीपर्यंत पोहोचली आहे, असं संजय राऊत म्हणाले. (Shivsena Foundation Day Sanjay Raut Rahul gandhi)

 

राहुल गांधी (Rahul Gandhi) देशाचे प्रमुख नेते आहेत. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून पक्षाची बांधणी वेगाने होवो, देशाच्या राजकारणातील त्यांचं स्थान बळकट होवो, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त (shiv sena foundation day) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी, सेना यापुढे देशाच्या राजकारणात प्रखरतेने दिसेल असं सांगितलं. “जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळेला लोक म्हणत होते की शिवसेना मुंबई-ठाण्याच्या पुढे जाणार नाही. पण शिवसेना महाराष्ट्रभर पसरली, आता महाराष्ट्राच्या सीमा पार करून दिल्लीपर्यंत पोहोचली आहे”

Published on: Jun 19, 2021 12:11 PM