Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम असून, पुढील 4 दिवस अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. शहरासह मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, प्रशासन सतर्क झाले आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम असून, पुढील 4 दिवस अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. शहरासह मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, प्रशासन सतर्क झाले आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापालिकेच्या प्राथमिक माहितीनुसार, शहरात आतापर्यंत 135 ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच घरांच्या भिंती कोसळण्याच्या 9 घटना नोंदवण्यात आल्या असून, संबंधित ठिकाणी यंत्रणांकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि दैनंदिन प्रवासात अडथळे निर्माण झाल्याने मुंबईकरांची मोठी तारांबळ उडाली आहे. अनेक भागांमध्ये वाहतुकीचा वेग मंदावला असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 4 दिवस मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, तसेच प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Published on: Jul 02, 2026 11:58 AM
गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल...
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये
वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुकांच्या लढ्याला..
शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत

