AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!

शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण… अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!

| Updated on: Jul 02, 2026 | 12:21 PM
Share

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना ठाकरे गटातील पक्षांतरांच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे खासदार अमोल कोल्हे यांच्या भूमिकेचीही चर्चा रंगू लागली आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांच्या बंडानंतर माजी मंत्री सचिन अहिर यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची धुरा स्वीकारल्याने विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना ठाकरे गटातील पक्षांतरांच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे खासदार अमोल कोल्हे यांच्या भूमिकेचीही चर्चा रंगू लागली आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांच्या बंडानंतर माजी मंत्री सचिन अहिर यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची धुरा स्वीकारल्याने विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

या घडामोडींमध्ये खासदार अमोल कोल्हे महायुतीत जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, या सर्व चर्चांवर आता अमोल कोल्हे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. माध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, आपण केलेले वक्तव्य हे पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात होते. “मी ऑफरचा विचार करू, असे म्हटले होते, मात्र त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. तो राजकीय ऑफरबाबत नव्हता,” असे त्यांनी स्पष्ट केले.

कोल्हे यांनी पुढे सांगितले की, काहीजण त्यांच्या वक्तव्याचा वेगळाच अर्थ लावत असून विनाकारण राजकीय चर्चा रंगवल्या जात आहेत. “कधी कधी काही लोक दिवसा स्वप्न पाहतात,” असा टोला त्यांनी या अफवांवर लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) एकसंध असल्याचे ठामपणे सांगत अमोल कोल्हे म्हणाले, “शरद पवार जे सांगतील तेच आमचे धोरण आहे. आम्ही सर्वजण शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने उभे आहोत.”

तसेच पक्षात कोणताही गटबाजीचा प्रश्न नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, “आम्ही पक्षात असूनही अशा कोणत्याही हालचालींची माहिती आम्हाला नसते, मात्र काही सूत्रांकडे अशा बातम्या आधीच पोहोचतात.” त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर महायुतीत प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jul 02, 2026 12:21 PM

Follow Us
Sunil Tatkare: जयंत पाटलांसोबत भेट झाली? सुनील तटकरे यांनी अखेर सगळं काही सांगितलं… घडलं काय?.

Sunil Tatkare: जयंत पाटलांसोबत भेट झाली? सुनील तटकरे यांनी अखेर सगळं काही सांगितलं… घडलं काय?

इराणचा मित्राकडूनच मोठा घात, शत्रूही करणार नाही असे काम, थेट ट्रम्प यांच्यासोबत हातमिळवणी करत...

इराणचा मित्राकडूनच मोठा घात, शत्रूही करणार नाही असे काम, थेट ट्रम्प यांच्यासोबत हातमिळवणी करत..

Adinath Kothare – Urmila Kanetkar Divorce : आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट; लेक जिजाबद्दल म्हणाले...

Adinath Kothare – Urmila Kanetkar Divorce : आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट; लेक जिजाबद्दल म्हणाले..

Vinayak Raut: विनायक राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार? राऊत यांनी दिले संकेत; काय घडणार?.

Vinayak Raut: विनायक राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार? राऊत यांनी दिले संकेत; काय घडणार?

लहानपणी ज्याला अंगा खांद्यावर खेळवलं तोच आता विरोधात उभा राहणार, Fifa World Cup Final पूर्वी एक अनोखी बाब समोर.

लहानपणी ज्याला अंगा खांद्यावर खेळवलं तोच आता विरोधात उभा राहणार, Fifa World Cup Final पूर्वी एक अनोखी बाब समोर

Sunil Gavaskar : हे खूप अति होईल..BCCI च्या कठोर पावलाआधी सुनील गावस्करांचा इशारा; 4 महिन्यांपूर्वी वर्ल्ड कप जिंकला, आता थेट...

Sunil Gavaskar : हे खूप अति होईल..BCCI च्या कठोर पावलाआधी सुनील गावस्करांचा इशारा; 4 महिन्यांपूर्वी वर्ल्ड कप जिंकला, आता थेट..